भारताच्या ‘जशास तसे’ उत्तरानंतर ब्रिटनकडून भारतियांना १० दिवस अलगीकरणात रहाण्याची अट रहित !

‘नाक दाबल्यावर तोंड उघडते’, याचे हे उत्तम उदाहरण होय ! भारताने अशी रोखठोक नीती नेहमीच अवलंबली, तर भारत महासत्ता बनण्यास वेळ लागणार नाही ! – संपादक

लंडन (ब्रिटन) – भारताच्या विरोधानंतर ब्रिटनने त्यांच्या देशात भारतातून येणार्‍या नागरिकांना १० दिवस अलगीकरणात ठेवण्याची अट रहित केली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भारतियांना ब्रिटनमध्ये आल्यावर १० दिवस अलगीकरणात ठेवण्याची अट ब्रिटनने घातली होती. त्याला भारताने ‘जशास तसे’ उत्तर देत ब्रिटीश नागरिकांनाही भारतात आल्यावर १० दिवस अलगीकरणात ठेवण्याची अट घातली. यापूर्वी ब्रिटनने भारताच्या लसीकरण प्रमाणपत्रालाही मान्यता देण्यास नकार दिला होता.