मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांचे निधन

कणकवली – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसेचे) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन शंकर दाभोलकर (वय ५४ वर्षे) यांचे ६ ऑक्टोबर या दिवशी दीर्घ आजाराने निधन झाले. मूळचे वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली येथील दाभोलकर कुटुंब तेलीआळी, कणकवली येथे स्थायिक झाले होते. राजन दाभोलकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ आणि काका, असा परिवार आहे.

‘दाभोलकर यांच्या निधनाने एक सच्चा मनसैनिक गमावला. मनसेला त्यांची उणीव कायम भासेल’, अशा शब्दांत मनसेचे राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.