७ ऑक्टोबर : नवरात्रोत्सवारंभ (घटस्थापना)

आज नवरात्रोत्सवारंभ (घटस्थापना)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥

जयन्ती मङ्गला काली भद्रकाली कपालिनी ।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु ते ।।

अर्थ : जयंती, मंगला, काली, भद्रकाली, कपालिनी, दुर्गा, क्षमा, शिवा, धात्री, स्वाहा आणि स्वधा या नावांनी प्रसिद्ध असणार्‍या हे देवी, तुला नमस्कार असो.

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात. ॐ

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शक्ति’)

नवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका : https://www.sanatan.org/mr/navratri