पाक संयुक्त राष्ट्रांत शांततेविषयी बोलतो; मात्र त्याचे पंतप्रधान ओसामा बिन लादेन याचा गौरव करतात ! – भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला फटकारले

अशा शाब्दिक फटकारण्याचा कोडग्या पाकवर काहीही परिणाम होत नसल्याने भारताने त्याला शस्त्रांच्या भाषेत धडा शिकवून भारतातील आतंकवादाची समस्या कायमची संपवावी ! – संपादक

डावीकडे ए. अमरनाथ आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांत शांतता आणि सुरक्षितता यांविषयी बोलतो; परंतु त्यांचे पंतप्रधान इम्रान खान हे जागतिक आतंकवादी ओसामा बिन लादेन याला ‘हुतात्मा’ संबोधून त्याला गौरवतात, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारले. काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारे भारताने पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारले होते.

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे प्रतिनिधी ए. अमरनाथ यांनी पुढे म्हणाले की, जागतिक आतंकवादाचे केंद्रबिंदू म्हणून पाकिस्तान वारंवार त्याच्या शेजारी देशांविरुद्ध आतंकवादाचा वापर करत आहे. त्याला संयुक्त राष्ट्रांच्या तत्त्वांची पर्वा नाही. या बहुपक्षीय मंचांवर खोटे पसरवण्याच्या प्रयत्नासाठी पाकिस्तान अवमानास पात्र आहेे.