बिकानेर (राजस्थान) येथे शिक्षकांच्या पात्रता परीक्षेत आधुनिक पद्धतीने कॉपी !

  • कॉपी करण्यासाठी भ्रमणभाष संच, इंटरनेट, ‘ब्लू टूथ’ आदी आधुनिक उपकरणांचा वापर

  • दीड कोटी रुपयांना विकली उपकरणे

  • कालपर्यंत विद्यार्थी कॉपी करत होते, आता जे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणार आहेत, असे शिक्षक होऊ इच्छिणारेच आधुनिक पद्धतीने कॉपी करत असतील, तर भारत किती अधोगतीला गेला आहे, हे लक्षात येते ! हे भारतियांना लज्जास्पद ! – संपादक
  • वाढती कॉपीची प्रकरणे म्हणजे आतापर्यंत शासनकर्त्यांनी जनतेवर संस्कार न परिणाम ! – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

बिकानेर (राजस्थान) – राजस्थान सरकारच्या शिक्षकांच्या पात्रता परीक्षेत मोठ्या प्रमाणात कॉपी (नक्कल) करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या वेळी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कॉपी करण्याचा प्रयत्न झाला. इंटरनेटच्या माध्यमांतून भ्रमणभाष संचाद्वारे हा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यावर इंटरनेट व्यवस्था बंद करण्यात आली. तरीही प्रशासनाला कॉपीचे प्रकार थांबवता आले नाहीत. बिकानेर येथील या संदर्भातील एका टोळीने इंटरनेट न वापरता कॉपी करण्याची आधुनिक व्यवस्था सिद्ध केल्याचे उघड झाले.