पितृपक्षातील काळात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपापेक्षा ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ या नामजपाचा साधकांवर पुष्कळ अधिक सकारात्मक परिणाम होणे

नामजपाविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

पितृपक्षाच्या निमित्ताने…

‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

सनातन-निर्मित दत्ताचे चित्र

‘समाजातील जवळजवळ प्रत्येकालाच अनिष्ट शक्तींचा त्रास असतो. अनिष्ट शक्तींमुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास होतात, तसेच जीवनात इतर अडचणीही येतात. अनिष्ट शक्ती साधकांच्या साधनेत अडथळेही आणतात; पण दुर्दैवाने बहुतेक जण अनिष्ट शक्तींच्या त्रासांविषयी अनभिज्ञ असतात. अनिष्ट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी नामजप-साधना करणे, हाच प्रभावी उपाय आहे. अनिष्ट शक्तींच्या त्रासांचे निवारण करणार्‍या उच्च देवतांपैकी एक म्हणजे दत्त. सध्याच्या काळी पूर्वीप्रमाणे कुणी श्राद्ध-पक्ष इत्यादी, तसेच साधनाही करत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या अतृप्त लिंगदेहांमुळे आध्यात्मिक त्रास होतो. दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्‍या शक्तीने नामजप करणार्‍याच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण होते. दत्ताच्या नामजपामुळे अतृप्त पूर्वजांना गती मिळते. त्यामुळे त्यांच्यापासून व्यक्तीला होणार्‍या त्रासाचे प्रमाण घटते.

कोणतीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. ‘काळानुसार सध्या देवतांचे तारक आणि मारक तत्त्व कोणत्या प्रकारच्या नामजपांतून अधिक मिळू शकते’, याचा अध्यात्मशास्त्रदृष्ट्या अभ्यास करून देवतांचे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. यासाठी सनातनच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय) यांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक प्रयोग केले. त्यांतून हे नामजप सिद्ध (तयार) झाले आहेत. त्यामुळे हे नामजप केल्यास त्यांतून काळानुसार आवश्यक असे त्या त्या देवतेचे तारक अथवा मारक तत्त्व प्रत्येकाला त्याच्या भावाप्रमाणे मिळण्यास साहाय्य होईल.

कु. तेजल पात्रीकर

पितृपक्षातील काळात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हे नामजप ऐकल्याचा व्यक्तीवर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण येथे दिले आहे.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली १ साधिका, आध्यात्मिक त्रास नसलेली १ साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसलेला ६७ टक्के पातळीचा १ साधक असे एकूण ३ साधक सहभागी झाले होते. या चाचणीत (पितृपक्षातील काळात) एकूण २ प्रयोग करण्यात आले. पहिल्या प्रयोगात त्यांना ‘श्री गुरुदेव दत्त।’ हा नामजप, तर दुसर्‍या प्रयोगात त्यांना ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप प्रत्येकी १ घंटा ऐकवण्यात आला. या प्रयोगांचा साधकांवर झालेला परिणाम येथे दिला आहे.

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हे नामजप ऐकल्याने चाचणीतील तिन्ही साधकांवर झालेला परिणाम : येथे दिला आहे.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेतील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत थोडी वाढ झाली. अन्य दोन्ही साधकांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. दोन्ही नामजप ऐकल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

२. ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप ऐकल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेतील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. अन्य दोन्ही साधकांमधील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.

३. ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाच्या तुलनेत ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप ऐकल्याने साधकांवर अधिक सकारात्मक परिणाम झाला.

सौ. मधुरा कर्वे

२. निष्कर्ष

पितृपक्षातील काळात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपापेक्षा ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप ऐकणे किंवा करणे अधिक लाभदायी आहे.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

३ अ. दत्ताच्या नामजपातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे चाचणीतील साधकांना आध्यात्मिक लाभ होणे : चाचणीतील तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात आढळल्या. (‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा व्यक्ती भोवतीचे त्रासदायक आवरण दर्शवते, तर ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा व्यक्तीच्या देहात अनिष्ट शक्तींनी साठवलेली त्रासदायक शक्ती दर्शवते.) साधिकेमध्ये सकारात्मक ऊर्जाही होती. चाचणीतील अन्य दोन्ही साधकांना आध्यात्मिक त्रास नाही. दत्ताच्या नामजपातून प्रक्षेपित झालेले चैतन्य तिन्ही साधकांनी त्यांच्या क्षमतेनुसार ग्रहण केल्याने त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.

३ आ. पितृपक्षातील काळात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाच्या तुलनेत ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ या नामजपाचा तिन्ही साधकांवर पुष्कळ अधिक सकारात्मक परिणाम होणे : चाचणीतील तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेला अनिष्ट शक्तींचा आणि पूर्वजांचाही त्रास आहे. पितृपक्षाच्या काळात व्यक्तीला होणार्‍या त्रासांमध्ये पुष्कळ वाढ होते. तसेच सध्याचा काळ हा आपत्काळ असल्याने अनिष्ट शक्तींमुळे होणार्‍या त्रासांचे प्रमाणही पुष्कळ वाढले आहे. साधकांना होणारे आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी त्यांना अधिक परिणामकारक उपायांची आवश्यकता असल्याने परात्पर गुरु डॉक्टरांनी दत्ताच्या नामजपाच्या आधी अन् नंतर २-२ ‘ॐ’ लावून जप करण्यास सांगितले. गुरु जेव्हा एखादी गोष्ट करण्यास सांगतात, तेव्हा त्यामागे त्यांचा संकल्प कार्यरत असतो. यामुळे गुरूंनी सांगितलेली कृती साधकांनी श्रद्धेने केल्यास त्यांना (साधकांना) आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतात. याचाच प्रत्यय चाचणीतून आला. पितृपक्षातील काळात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपापेक्षा ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ या नामजपामुळे साधकांचा त्रास पुष्कळ न्यून होऊन त्यांना देवता तत्त्वाचा (दत्त तत्त्वाचा) अधिकाधिक लाभ झाल्याचे चाचणीतून दिसून आले.

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१४.१२.२०२०)
ई-मेल : [email protected]

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा नामजपांमागे असलेला संकल्प

जगभरातील साधकांचे आध्यात्मिक त्रास लवकर दूर व्हावेत, तसेच त्यांना देवतांच्या तत्त्वांचा अधिकाधिक लाभ व्हावा, यांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार देवतांचे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. यामध्ये त्यांचा अप्रत्यक्ष संकल्पच कार्यरत झाला असल्याने या नामजपांनुसार साधकांनी नामजप केल्यास त्यांचे त्रास दूर होण्यास, तसेच त्यांना देवतांच्या तत्त्वांचा लाभ होण्यास निश्चितच साहाय्य होईल.’