चीनचे ‘एव्हरग्रँड’ आस्थापन कर्जात बुडाल्याने गुंतवणूकदारांची १० लाख कोटी रुपयांची हानी

नवी देहली – चीनचे रिअल इस्टेट (भूमी खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय) आस्थापन ‘एव्हरग्रँड’ कर्जामध्ये बुडाले आहे. जगभरातील गुंतवणूकदारांची १० लाख कोटींची हानी झाली आहे. याचा भारतावरही परिणाम होणार आहे.

या आस्थापनाचे ८०० हून अधिक प्रकल्प निर्माणाधीन आहेत. यांत पैसे लावणार्‍यांचा पैसा बुडणार आहे. जगभरातील अनेक आस्थापने एव्हरग्रँडसमवेत व्यवसाय करतात. बांधकाम, साहित्य पुरवठा आदी क्षेत्रांतील आस्थापनांनी कोट्यवधी रुपयांचा माल एव्हरग्रँडला दिलेला आहे. यामुळे काही आस्थापने दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे. एव्हरग्रँडने चीनमधील १७१ बँका आणि १२१ आर्थिक संस्था यांच्याकडून कर्ज घेतली आहेत. कर्ज बुडाले, तर या बँकादेखील दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे. जर आस्थापनाने व्याज भरले नाही, तर त्या बँकादेखील ग्राहकांना अल्प व्याज देतील, तसेच कर्जदारांकडून अधिक व्याज दर आकारतील. यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला हे पेलवणारे नाही, असे म्हटले जात आहे.