अमेरिकेला नव्याने ‘शीतयुद्ध’ नको ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना

न्यूयॉर्क (अमेरिका) – ज्यामुळे जग विभागले जाईल, अशा नव्या शीतयुद्धाच्या विचारात आम्ही नाही. शांततापूर्ण ठरावांचा पाठपुरावा करणार्‍या कोणत्याही देशासमवेत काम करण्यास अमेरिका सिद्ध आहे; कारण आपल्या सर्वांना आपल्या अपयशाचे परिणाम भोगावे लागतात, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत केले. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच ते महासभेला संबोधित करत होते.

बायडेन पुढे म्हणाले की, आम्हाला आतंकवादाचे दंश ठाऊक आहेत. आमच्याविरुद्ध जे आतंकवादी कृत्ये करतील, त्यांचा सर्वांत मोठा शत्रू अमेरिका असेल, अशी चेतावणीही त्यांनी दिली.