धर्मांध ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून कर्नाटकातील सत्ताधारी भाजपच्या आमदाराच्या आईचे धर्मांतर !

१८ ते २० सहस्र लोकांचे धर्मांतर केल्याची माहिती

  • मिशनर्‍यांना रोखणार्‍यांविरुद्ध खोटे गुन्हे नोंद करण्याची ख्रिस्त्यांची युक्ती – संपादक
  • भाजपच्या राज्यात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक
  • भाजपच्या एका आमदाराच्याच घराची ही स्थिती असेल, तर देशातील सर्वसामान्य हिंदूंच्या दुरवस्थेची कल्पना करता येणार नाही ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने आज ही स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – संपादक
आमदार गूळी हट्टी शेखर

बेंगळुरू – धर्मांध ख्रिस्ती मिशनर्‍यांनी कर्नाटकचे माजी मंत्री तथा सत्ताधारी भाजपचे विद्यमान आमदार गूळी हट्टी शेखर यांच्या आईचे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेखर यांनी स्वतःच ही माहिती विधानसभेत दिली, तसेच त्यांनी त्यांच्या होसादुर्ग विधानसभा मतदारसंघात कार्यरत असणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
शेखर पुढे म्हणाले की, ‘‘ख्रिस्ती मिशनरी हे होसादुर्ग विधानसभा मतदारसंघात प्रचंड प्रमाणात धर्मांतर करत आहेत. या मिशनर्‍यांनी अनुमाने १८ ते २० सहस्र लोकांचे धर्मांतर करून त्यांना ख्रिस्ती बनवले आहे. एकदा ख्रिस्ती मिशनर्‍यांनी माझ्या आईला प्रार्थनेसाठी बोलावले. ‘प्रार्थनेला आल्यावर तुम्हाला चांगले वाटेल’, असे त्यांनी तिला सांगितले. माझी आई मिशनर्‍यांच्या जाळ्यात अडकली आणि नंतर त्यांनी तिचे धर्मांतर केलेे. आता ते तिला कुंकूही लावू देत नाहीत. माझी आई आमच्या घरातील देवतांची छायाचित्रे, तसेच देवघरातील पूजासाहित्य यांकडे पहातही नाही. माझ्या आईच्या भ्रमणभाषची ‘रिंगटोन’ (कुणी संपर्क केल्यावर भ्रमणभाषवर वाजणारा ध्वनी) पालटली असून ती आता ख्रिस्त्यांची एक प्रार्थना आहे. आमच्या घरी दैनंदिन पूजा करणेही आता कठीण होत चालले आहे. आम्ही आईला काही सांगायला गेलो, तर ती आत्महत्या करण्याची धमकी देते. आमच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. ख्रिस्ती मिशनर्‍यांना रोखण्याचा प्रयत्न करणार्‍यांविरुद्ध अत्याचाराचे खोटे गुन्हे नोंद करण्याची युक्ती त्यांनी अवलंबिली आहे. सरकारने यावरही कारवाई करावी.’’

या प्रकरणी कारवाई करू ! – गृहमंत्री

गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र

‘ख्रिस्ती मिशनरी करत असलेल्या धर्मांतराच्या प्रकरणी कारवाई करू’, असे आश्‍वासन राज्याचे गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी गूळी हट्टी शेखर यांना दिले. ‘कुणालाही आमीष दाखवून त्याचे धर्मांतर करणे हा गुन्हा आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(म्हणे) ‘एक घटना सर्वांना लागू केली जाऊ नये !’ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.जे. जॉर्ज

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.जे. जॉर्ज म्हणाले की, एक घटना सर्वांना लागू केली जाऊ नये. काही लोकांच्या चुकीचा दोष सर्व चर्चवर लादला जाऊ नये.

तुम्ही तुमच्या आरोपामध्ये सर्वांचा समावेश करू नका ! – विधानसभेच्या अध्यक्षांनी गूळी हट्टी शेखर यांनाच सुनावले

यावर विधानसभेचे अध्यक्ष विशवेश्‍वरा हेगडे कागेरी यांनी जॉर्ज यांच्या वक्तव्याचे समर्थन केले, तसेच शेखर यांना ‘तुम्ही तुमच्या आरोपामध्ये सर्वांचा समावेश करू नका’, अशा शब्दांत त्यांना सुनावले. (राजकीय नेत्यांच्या अशा निधर्मीपणामुळेच आज हिंदूंच्याच देशात त्यांची स्थिती केविलवाणी झाली आहे. हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक)