‘११.५.२०२० या दिवशी रात्री ८.३० वाजता मी कोरोना विषाणुंमुळे निर्माण झालेल्या आपत्काळात आध्यात्मिक बळ आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी श्री दुर्गादेवी, शिव अन् दत्त यांचा नामजप करत बसलो होतो. माझे मन एकाग्र झाले होते. नामजप करतांना मला सर्वांगाला उष्णता जाणवत होती. ‘मी एखाद्या अग्नीजवळ बसलो आहे’, असे मला जाणवत होते. सूक्ष्मातून धूर अधिक झाल्यावर माझ्या डाव्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यानंतर अन्य एक साधक खोकू लागला आणि एकाग्रता भंग होऊन मी भानावर आलो. काही वेळ मला औदुंबराच्या समिधांचा सुगंध दरवळतांना जाणवला. ही अनुभूती दिल्याबद्दल मी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञ आहे.’ – श्री. नंदकिशोर नारकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.५.२०२०)
|