यवतमाळ येथील कै. रवींद्र देशपांडे यांचे निधन झाल्यावर होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी यांना आलेली अनुभूती

कै. रवींद्र देशपांडे

१. कै. रवींद्र देशपांडे यांची आत्मज्योत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समोर येऊन ती रामनाथी आश्रमात विलीन होणे, त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेक आत्मज्योतींचे स्वागत करून त्यांना वैकुंठरूपी रामनाथी आश्रमात विलीन करवून घेत असल्याचे सूक्ष्मातून दिसणे : ‘मे २०२१ मध्ये कै. रवींद्र देशपांडे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतरच्या दहाव्या दिवशी त्यांच्या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या लिखाणाचे मी वाचन करत असतांना मला सूक्ष्मातून रामनाथी आश्रमाचे दर्शन झाले. ‘मुख्य प्रवेशद्वाराजवळ परात्पर गुरु डॉ. आठवले पांढर्‍या पोशाखात कुणाच्या तरी आगमनाची वाट पहात आहेत’, असे मला दिसले. काही क्षणांत कै. रवींद्र देशपांडे यांची आत्मज्योत त्यांच्यासमोर आली. परात्पर गुरुदेवांनी त्या ज्योतीचे स्वागत केले आणि ती ज्योत रामनाथी आश्रमात विलीन झाली. त्यानंतर अनेक ज्योती एका मागोमाग एक येत असल्याचे दिसले. त्या सर्वांचे परात्पर गुरु डॉक्टरांनी हात जोडून स्वागत करून त्यांना वैकुंठरूपी रामनाथी आश्रमात विलीन करून घेत असल्याचे मला दिसले.

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी

२. रामनाथी आश्रमात विलीन होणार्‍या आत्मज्योती म्हणजे आपत्काळात प्राणत्याग केलेले साधक जीव असून ते परात्पर गुरु डॉक्टरांचे भक्त असल्याचे त्यांनी सूक्ष्मातून सांगणे ः त्या ज्योती रामनाथी आश्रमात येताच स्थिर होऊन अदृश्य होत होत्या. ‘या ज्योती म्हणजे कोण असतील ?’,असा प्रश्न माझ्या मनात येताच परात्पर गुरुदेव म्हणाले, ‘या आपत्काळात जे साधक (केवळ सनातनचे नव्हे, तर सर्वच साधक जीव) प्राणत्याग करत आहेत, ते सर्व माझेच आहेत. ते माझे भक्त आहेत. त्यांच्या भक्तीमुळे मला आनंद मिळत आहे.’ त्यांचे हे बोलणे ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

३. नंतर परात्पर गुरुदेवांच्या जागी मला केवळ पारदर्शक प्रवाह आणि अर्ध पारदर्शक पांढरा प्रकाश दिसला. तेव्हा ‘परात्पर गुरुदेव परमेश्वर स्वरूप आहेत’, हे जाणून मी त्यांच्या चरणी नतमस्तक झाले. त्यानंतर बराच वेळ मी भावस्थितीत होते.’

– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.७.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक