सनातनचे ७२ वे संत पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) यांचे छायाचित्र पाहून त्यांचा मुलगा श्री. सोहम् सिंगबाळ (वय २४ वर्षे) याला जाणवलेली सूत्रे

भाद्रपद पौर्णिमा (२०.९.२०२१) या दिवशी पू. नीलेश सिंगबाळ यांचा ५५ वा वाढदिवस आहे. पू. नीलेश सिंगबाळ यांच्यातील भाव आणि आनंद यांत वृद्धी झाल्याने त्यांच्या तोंडवळ्यामध्ये चांगला पालट झाला आहे. त्यांचे शेजारील छायाचित्र पाहिल्यावर त्यांचा मुलगा श्री. सोहम् सिंगबाळ याला जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पू. नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, 

पू. नीलेश सिंगबाळ यांना ५५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

श्री. सोहम् सिंगबाळ

१. ‘बाबांच्या छायाचित्रातील त्यांचा तोंडवळा प्रकाशमान वाटला.

२. छायाचित्र पहातांना ‘बाबा श्वास घेत आहेत’, असे मला जाणवले.

३. छायाचित्रातील बाबांचे डोळे, ओठ आणि गाल यांमध्ये हालचाल जाणवली.

४. आवंढा गिळल्यावर घशाची जशी हालचाल होते, तशी हालचाल त्यांच्या गळ्याकडील भागात होत असल्याचे मला अधूनमधून जाणवत होते.

५. बाबांचे छायाचित्र जिवंत वाटले. त्यांच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘आता ते बोलतील’, असे मला वाटले.

‘देवाच्याच कृपेने मला हे अनुभवता आले’, याकरता त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

हे छायाचित्र पाहिल्यावर बाबा म्हणाले, ‘‘छायाचित्र वेगळेच वाटते. ‘हे माझे छायाचित्र आहे’, असे मला वाटत नाही, इतके ते निराळे वाटत आहे.’’

– श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ (मुलगा, वय २४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक