मंदिरे ही भक्तांच्या कह्यात असायला हवीत ! – संपादक
शिर्डी – देशातील दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान असलेल्या श्री साईबाबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे यांची संस्थानच्या अध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे जगदीश सावंत यांची नेमणूक झाली आहे. त्यांच्यासह अकरा सदस्यांनी १८ सप्टेंबरला शिर्डीत येऊन पदभार स्वीकारला. साईसंस्थानच्या १७ विश्वस्तांपैकी १२ जणांची सूची सरकारने घोषित केली आहे. श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या नेमणुकीचा तिढा अखेर २१ मासांनंतर सुटला.