रामनाथी आश्रमात झालेल्या सौरयागाच्या वेळी जळगाव येथील श्री. पुंडलीक माळी यांना आलेल्या अनुभूती

यज्ञ (प्रतीकात्मक छायाचित्र)

१. ‘सौरयागाच्या आदल्या दिवशी, म्हणजे ६.४.२०१९ या दिवशी मी रामनाथी आश्रमात होतो. तेव्हा यज्ञस्थळी गेल्यावर ‘आपण पृथ्वीवर नसून उच्च लोकात आहोत’, असे मला जाणवले आणि मला पुष्कळ चांगले वाटले.

२. यज्ञस्थळी उपस्थित असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याभोवती सूक्ष्मातून पिवळा प्रकाश दिसत होता, तसेच त्यांच्या माध्यमातून यज्ञस्थळी सूर्यकिरणासारखा प्रकाश पडल्याचे मला जाणवले. (तेव्हा त्या ठिकाणी प्रत्यक्षातही सूर्यकिरण पडले होते.)

३. यज्ञ पूर्ण झाल्यावर शेवटी सूर्यदेवाची आरती आणि त्यानंतर कापूर-आरती चालू असतांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ सूर्यदेवाला ओवाळत होत्या. तेव्हा मला पंचारतीतील ज्योतीच्या पिवळ्या प्रकाशाच्या ठिकाणी निळ्या रंगाच्या प्रकाशमय ज्योती दिसत होत्या.’

– श्री. पुंडलीक रामचंद्र माळी , जळगाव (एप्रिल २०१९)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक