राष्ट्रीय स्तरावरील महिला खो-खो खेळाडूवर बलात्काराचा प्रयत्न फसल्यावर धर्मांधाकडून तिची हत्या

अशा वासनांधांवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !- संपादक

(प्रतिकात्मक चित्र)

बिजनौर (उत्तरप्रदेश) – येथे राष्ट्रीय स्तरावरील महिला खो-खो खेळाडूची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शहजाद उपाख्य खादीम याला अटक केली आहे. शहजाद याने येथील रेल्वे स्थानकाजवळून या महिला खेळाडूला खेचून निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला; मात्र हा प्रयत्न फसल्याने गळा आवळून तिची हत्या केली. शहजाद विवाहित असून तो सराईत चोर आहे. त्याला अनेकदा अटकही करण्यात आली होती. त्याला अमली पदार्थांचे व्यसन आहे. (अनेकदा अटक करूनही व्यक्तीची गुन्हेगारी वृत्ती नष्ट होत नाही. त्यासाठी अशी वृत्ती नष्ट होईपर्यंत शिक्षा केली पाहिजे, तरच समाजामधील गुन्हेगारी न्यून होईल ! – संपादक)