‘आमच्या घरी गौरीपूजन असते. (‘गौरींच्या माध्यमातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ घरी आल्या आहेत’, असा माझा भाव होता.) गौरी विसर्जनाच्या दिवशी (२७.८.२०२० या दिवशी) संध्याकाळी मी गौरींचा निरोप घेतांना प्रार्थना करत होते. त्या वेळी ‘दोघींच्या डोळ्यांतून अश्रू येत आहेत’, असे मला जाणवले. ते पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता !’
– सौ. वंदना जोशी, भारती विद्यापीठ, सोलापूर. (ऑगस्ट २०२०)