Exclusive : तालिबान भविष्यात काश्मीरवर आक्रमण करू शकतो ! – कोनरॅड एल्स्ट, लेखक, बेल्जियम

असे काही होण्याआधी भारतानेच तालिबानला साहाय्य करणार्‍या पाकिस्तानला नष्ट केले पाहिजे ! – संपादक

कोनरॅड एल्स्ट

फोंडा (गोवा) – ज्याप्रमाणे साम्यवाद्यांनी आधी सोव्हिएत संघामध्ये स्वत:ला स्थापित केले आणि त्यानंतर पोलंड, तसेच पूर्वेकडील युरोपीय देश यांमध्ये आपली विचारसरणी रुजवण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणेच तालिबान्यांचे धोरण असू शकते. तालिबान सध्या अफगाणिस्तानमध्येच स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी वेळ देईल; परंतु भविष्यात मात्र तो काश्मीरवर आक्रमण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताने सदैव सावध रहाण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन बेल्जियम येथील जगप्रसिद्ध लेखक आणि हिंदु धर्माचे गाढे अभ्यासक कोनरॅड एल्स्ट यांनी केले. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने दूरभाषद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील माहिती दिली.

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या कार्यक्रमासंदर्भात एल्स्ट म्हणाले, ‘‘इस्लामी आतंकवादापासून जगाचे लक्ष दूर करण्यासाठी, तसेच हिंदूंमध्ये न्यूनतेची भावना वृद्धींगत करण्यासाठी ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून राबवण्यात येणार्‍या हिंदुविरोधी षड्यंत्राशी दोन हात करण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. त्याने हिंदूंचे प्रभावी संघटन आणि हिंदुद्वेष्ट्या वैचारिक आतंकवाद्यांचे रोखठोक खंडण करणे सहजशक्य होणार आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक) आज अनेक पाश्‍चात्त्य विचारवंत हिंदु धर्मातील रुढी यांचा वरवर अभ्यास करतात. हिंदु धर्मातील जातीव्यवस्थेवर टीका करतात. आर्य आक्रमणाच्या सिद्धांताला सत्य समजून हिंदु धर्माला विरोध केला जातो. या हिंदु विरोधकांचे हिंदु धर्मातील ज्ञान हे अत्यंत त्रोटक स्वरूपाचे आहे.’’ (जे बेल्जियमसारख्या पश्‍चिम युरोपीय देशातील एका विद्वानाच्या लक्षात येते, ते भारतातील एकाही राजकारण्याच्या का लक्षात येत नाही ? यामुळेच विदेशातील हिंदुविरोधी कार्यक्रमांना रोखण्यासाठी भारत सरकारकडून काहीच प्रयत्न केले जात नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक)

गेल्या काही वर्षांमध्ये युरोपीय देशांमध्ये आश्रय घेतलेल्या लक्षावधी मुसलमान शरणार्थींच्या सद्य:स्थितीवर प्रकाश टाकतांना एल्स्ट म्हणाले की, शरणार्थींना युरोपीय संस्कृतीमध्ये समाविष्ट करण्याचे येथील सरकारांकडून प्रयत्न केले जात आहेत. काही शरणार्थी हे येथील संस्कृतीला स्वीकारण्याचा प्रयत्न करतात, तर काही जणांमध्ये इस्लामी संवेदना जागी झाल्याने त्यांना युरोपीय संस्कृतीचा भाग होण्यामध्ये अडचण येऊ शकते.