दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित दिवंगत कवी प्रदीप यांनी देशाच्या स्वातंत्र्याविषयी हिंदूंना विचारलेले काही प्रश्न !

आज ६.९.२०२१ या दिवशी तिथीनुसार भारताचा ‘स्वातंत्र्यदिन’ आहे. त्या निमित्ताने…

कवी प्रदीप यांचा संक्षिप्त परिचय

कवी प्रदीप

१. मूळ नाव : रामचंद्र नारायणजी द्विवेदी

२. जन्म : ६.२.१९१५, बडनगर, उज्जैन, मध्यप्रदेश.

३. मृत्यू : ११.१२.१९९८, मुंबई.

४. अन्य वैशिष्ट्यपूर्ण :
अ. आजही स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन या दोन्ही दिवशी देशभर गल्ली-बोळात दिवसभर वाजणारे अन् अत्यंत सुप्रसिद्ध असलेले ‘ए मेरे वतन के लोगों…’ हे गीत कवी प्रदीप यांनी लिहिले आहे. हे गीत २६ जानेवारी १९६३ या दिवशी देहलीच्या रामलीला पटांगणात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी प्रथम गायले होते. वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धातील हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी कवी प्रदीप यांनी ते लिहिले होते. या गीताविषयी त्यांना मिळालेले मानधन त्यांनी हुतात्मी सैनिकांच्या पत्नींसाठी अर्पण केले होते.

आ. दुसरे महत्त्वाचे गीत ‘दूर हटो ए दुनियावालो हिंदुस्तान हमारा है ।’, या गीतासाठी इंग्रजांनी कवी प्रदीप यांना अटक करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे त्यांना भूमीगत व्हावे लागले होते.

दिवंगत कवी प्रदीप यांची काही वर्षांपूर्वी एका दूरचित्रवाहिनीच्या पत्रकाराने मुलाखत घेतली होती. त्यात कवी प्रदीप यांनी हिंदूंना काही प्रश्न विचारले होते. ते प्रश्न पुढे देत आहोत.

१. दिनांक १५ ऑगस्ट जो आम्ही इतक्या उत्साहाने स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो, त्या १५ ऑगस्टला आम्हाला काय मिळाले ?

२. मुसलमानांना पाकिस्तान आणि बांगलादेश असे २ देश मिळाले. आम्हाला काय मिळाले ? उलट आमच्या देशाचा एक तृतीयांश भाग तोडला गेला. तो का गेला ?

३. जगात असा एकही देश नाही, ज्याची फाळणी धर्माच्या आधारावर झाली. मुळात फाळणी व्हायलाच नको होती; पण झालीच, तर मग सगळे मुसलमान पाकिस्तानात जायला पाहिजे होते आणि सगळे हिंदू हिंदुस्थानात यायला पाहिजे होते; पण तसेही झाले नाही. जे झाले ते अत्यंत अयोग्य होते; कारण हे कुठल्याच तर्काने योग्य वाटत नाही. मुसलमानांनी हिंदूंची अमानुष कत्तल केली. त्यामुळे हे एक षड्यंत्र होते का ? आजही समजत नाही की, हे असे का झाले ?

४. इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी जून १९४८ हा काळ निश्चित केला होता; पण यांनी (गांधी आणि नेहरू यांच्या काँग्रेसने) नेताजींच्या भीतीने १५ ऑगस्ट १९४७ मध्येच ते घेतले; कारण नेताजी सुभाषचंद्र बोस आले, तर..? इंग्रजांनीही नेताजींच्याच भीतीने स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले होते; म्हणून त्यांनी सांगितले होते की, जून १९४८ मध्ये आम्ही आमचे इंग्रज अधिकारी काढतो आणि तुमचे भरती करतो. त्यामुळे कुठली मारकाट होणार नाही; पण यांनी (गांधी आणि नेहरू यांच्या काँग्रेसने) ऐकले नाही. १५ ऑगस्टला आमच्या नद्यांचे पाणी रक्ताने लाल होत होते, तेव्हा नेहरू स्वतःच्याच एका विश्वात होते, अभिनंदनाचा स्वीकार करत होते. काय मिळाले होते आम्हाला ? जगात त्यांचे (मुसलमानांचे) ५० हून अधिक देश होते त्यांना आणखी २ मिळाले. देशापेक्षा अन्य काही मोठे असू शकते का ?

५. दिनांक १५ ऑगस्टला खरेतर ‘शोकदिवस’ म्हटले पाहिजे. १० लाख हिंदूंची कत्तल आणि कोट्यवधी हिंदूंचे जीवन उद्ध्वस्त झाले. त्यांना निर्वासित म्हणून जगावे लागले; म्हणून हा ‘शोकदिवस’ म्हटला पाहिजे. असे काय मिळाले होते आम्हाला; म्हणून आजही १५ ऑगस्टला सैनिकांच्या ‘मेस’मध्ये (स्वयंपाकघरामध्ये) स्वादिष्ट आणि रुचकर पदार्थ बनवले जातात. जगात असा कुठला दुसरा देश आहे, ज्याची धर्माच्या नावावर फाळणी झाली ? आणि हे कशासाठी ? केवळ एका माणसाला (नेहरूंना) पंतप्रधान बनवण्यासाठी ? नेताजींना येथून जावे लागले आणि सरदार पटेल यांना डावलले. का ? हे आमच्यासाठी (हिंदूंसाठी) एक षड्यंत्र होते का ?

हे प्रश्न मी लोकांना विचारतो. तुम्हीही विचारा. हे जे काही घडले, ते आजपर्यंत मला समजले नाही; म्हणून कमीतकमी १५ ऑगस्टला ‘शोकदिवस’ तरी म्हणा !

(साभार : सामाजिक संकेतस्थळ)