निपाणी (कर्नाटक), ३ सप्टेंबर (वार्ता.) – येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने ‘गणेशोत्सव नाही, तर मतदान नाही !’ या आशयाचा फलक लावून सर्वच राजकीय पक्षांना चेतावणी दिली आहे. ‘राजकीय नेत्यांच्या सभा आणि मिरवणुका यांना गर्दी चालते, तर गणेशोत्सवाला गर्दी का नाही ? ज्या सणांमुळे अनेकांची घरे चालतात, त्याच सणांना तुम्ही बंदी का घालता ? बाकी सगळे चालते; पण गणेशोत्सवामध्ये मात्र कोरोना पसरतो का ? सर्व नियम आणि अटी सामान्य जनतेला का ?’ त्यामुळे ‘गणेशोत्सव नाही, तर मतदान नाही !’, अशी चेतावणी देऊन ‘माझा सण माझे दायित्व’, अशा वाक्याद्वारे फलकाचा शेवट करण्यात आला आहे.