एका जिल्ह्यात सहस्रो बालके अतीकुपोषित असणे हे महाराष्ट्रासाठी गंभीर आणि चिंताजनक आहे. स्वातंत्र्यानंतरची हीच का प्रगती ? – संपादक
संभाजीनगर – जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात २ लाख ११ सहस्र मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात १ सहस्र ३३३ अतीकुपोषित बालके, तर मध्यम कुपोषित ७ सहस्र २२४ बालके आढळून आली आहेत. गंगापूर भागात सर्वाधिक कुपोषित बालके आढळून आली आहेत. ज्यात अतीकुपोषित १६१, तर मध्यम कुपोषित १ सहस्र ८४ बालके आढळून आली आहेत, अशी माहिती महिला बालविकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली. १७ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. या बालकांसाठी सप्टेंबरमध्ये विशेष उपाययोजना करण्यात येणार आहे, असे प्रसाद मिरकले यांनी सांगितले.