न्यूयॉर्क शहरात ‘इडा’ चक्रीवादळामुळे ४९ जणांचा मृत्यू

चक्रीवादळाचा तडाखा बसल्यामुळे निर्माण झालेली पूरस्थिती

न्यूयॉर्क (अमेरिका) – शहराला ‘इडा’ नावाच्या चक्रीवादळाचा तडाखा बसल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात आतापर्यंत ४९ लोकांचा मृत्यू झाला, तर अनेक वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क शहर आणि उर्वरित भाग येथे एका रात्रीसाठी आणीबाणी घोषित करण्यात आली होती. महानगर परिवहन प्राधिकरणाने सर्व सेवा स्थगित केल्या आहेत. बस आणि ट्रेन बंद आहेत. अनेक विमानांची उड्डाणे रहित करण्यात आली आहेत. अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. प्रशासनाने लोकांना घरातच रहाण्याचा सल्ला दिला आहे.