मुंबई – मला अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस मिळाली आहे; मात्र त्यामध्ये कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख नाही. नोटिसमागील कायदेशीर कारण समजल्यावरच उत्तर देऊ, अशी भूमिका परिवहनमंत्री अनिल परब यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे मांडली. २९ ऑगस्ट या दिवशी अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडीकडून) नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये ३१ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता त्यांना चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या प्रकरणी ही नोटीस असल्याचे सांगितले जात आहे.