२ ठार, तर ३ घायाळ !
काबुल (अफगाणिस्तान) – येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील निवासी भागावर २९ ऑगस्टला सायंकाळी ६ च्या सुमारास अमेरिकेकडून ‘रॉकेट’द्वारे आक्रमण करण्यात आले आहे. या आक्रमणामध्ये २ जण ठार, तर तिघे घायाळ झाले, अशी माहिती ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिली आहे. या आक्रमणामागील कारण स्पष्ट झालेले नाही.
विमानतळाबाहेर पुन्हा बाँबस्फोट होण्याची शक्यता ! – जो बायडेन
आक्रमणाच्या काही घंट्यांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘काबुल विमानतळावर लवकरच पुन्हा आतंकवादी आक्रमण करू शकतात’, अशी चेतावणी दिली होती. तसेच अमेरिकी दूतावासाने अमेरिकी नागरिकांना त्वरित काबुल विमानतळाच्या आसपासच्या भागांतून माघारी फिरण्याचे आदेश दिले होते. २६ ऑगस्ट या दिवशीही या विमानतळाबाहेर झालेल्या बाँबस्फोटांचीही चेतावणी देण्यात आली होती; मात्र हे स्फोट रोखण्यास अफगाणिस्तानमधील सध्याचे सत्ताधारी तालिबानी अपयशी ठरले होते.