श्रावण कृष्ण पक्ष षष्ठी (२८.८.२०२१) या दिवशी पू. (श्रीमती) गीतादेवी खेमकाआजी यांचा ७९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची कन्या आणि नातू यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
पू. (श्रीमती) गीतादेवी खेमकाआजी यांच्या चरणी ७९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
सौ. पुष्पा गोयल (कन्या) (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), जयपूर, राजस्थान.
१. मुलीला साधनेत साहाय्य करणे
‘पू. आई माझ्या नामजपादी उपायांचा आढावा घेतात. माझे नामजपादी उपाय अल्प झाल्यास त्या मला त्याची जाणीव करून देतात. त्यामुळे माझ्या नामजप करण्याच्या प्रयत्नांत वाढ होत आहे.
२. पू. आई अखंड भावस्थितीत आणि गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात.’ (२६.७.२०२१)
श्री. आकाश गोयल (नातू) (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), भाग्यनगर, तेलंगाणा.
१. सातत्य आणि चिकाटी
‘पू. खेमकाआजी नियमितपणे व्यायाम करतात. त्या नियमितपणे पोथीवाचन आणि मंत्रजप करतात. त्या प्रतिदिन नामजपादी उपाय तळमळीने पूर्ण करतात.
२. वेळेचे पालन करणे
पू. आजी ‘सकाळी उठणे, व्यायाम करणे, वैयक्तिक कामे करणे आणि नामजप करणे’ इत्यादी कृती ठरलेल्या वेळेत करतात.
३. इतरांना साहाय्य करणे
पू. आजी ७८ वर्षांच्या असतांना आमच्या घरी दीड मास रहायला आल्या होत्या. तेव्हा त्या माझ्या आईला स्वयंपाक करायला साहाय्य करायच्या.
४. अल्प अहं
पू. आजी संत असूनही त्या ‘मी साधनेत आणखी काय प्रयत्न करायला हवेत ?’, असे विचारतात.
५. श्रद्धा
माझे मामा सुदीप खेमका (पू. आजींचा मुलगा) यांचे कोरोनामुळे निधन झाले. तेव्हाही पू. आजींची गुरुदेवांवरची श्रद्धा डळमळीत झाली नाही. पू. आजी या दुःखद प्रसंगातही स्थिर राहून कुटुंबातील अन्य सदस्यांना धीर देत होत्या.
६. कृतज्ञताभाव
‘गुरुदेवांच्या कृपेनेच माझे सर्व प्रयत्न होतात’, असा त्यांचा अखंड भाव असतो.
७. पू. आजींच्या संदर्भात आलेली अनुभूती
पू. आजी घरी रहायला आल्यावर घरातील त्रास आणि साधकाला होत असलेला अनिष्ट शक्तींचा त्रास न्यून होऊन त्याला साधनेचे प्रयत्न करायला ऊर्जा मिळणे : पू. आजी आमच्या घरी येण्यापूर्वी घरात त्रास जाणवायचा. त्या वेळी मला होत असलेला अनिष्ट शक्तींचा त्रासही वाढला होता. पू. आजी घरी रहायला आल्यावर घरात जाणवणारा त्रास आणि मला होत असलेला त्रास न्यून होऊन मला व्यष्टी साधनेचे प्रयत्न करायला ऊर्जा मिळाली.’ (२६.७.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |