तालिबानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून फुकाचे बोल !
|
नवी देहली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘आतंकवादाच्या माध्यमातून स्थापन केलेली सत्ता ही कायमस्वरूपी नसते’ हे विधान आम्ही आव्हान म्हणून स्वीकारत आहोत. आम्ही आतंकवादाच्या बळावर मिळवलेली सत्ता टिकवून ठेवू, असे वक्तव्य तालिबानचा प्रमुख नेता शहाबुद्दीन दिलावर याने केले आहे. ‘तालिबान अफगाणिस्तानमध्ये योग्य पद्धतीने प्रशासकीय कारभार चालवत असल्याचे लवकरच भारताला दिसून येईल’, असेही दिलावर याने म्हटले. काही दिवसांपूर्वी मोदी यांनी एका कार्यक्रमामध्ये वरील प्रकारचे विधान केले होते.
दिलावर याने ‘रेडिओ पाकिस्तान’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारताला चेतावणी देतांना, ‘भारताने अफगाणिस्तानच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये लक्ष देऊ नये. (तालिबाननेही काश्मीर प्रश्नात नाक खुपसू नये, हे त्याला ठणकावून सांगणे आवश्यक ! – संपादक) पाकिस्तान आमचे ‘मित्रराष्ट्र’ आहे. त्याने ३० लाखांहून अधिक अफगाणिस्तानी नागरिकांना आश्रय दिल्याविषयी मी आभारी आहे’, असे म्हटले आहे. ‘तालिबानला जगातील प्रत्येक देशासमवेत शांततापूर्ण आणि सामंजस्यावर आधारित सन्मानजनक संबंध ठेवण्याची इच्छा आहे’, असेही तो म्हणाला. (यावर कोण विश्वास ठेवील ? – संपादक)
नेमकं काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी… काय आली प्रतिक्रिया… जाणून घ्या…#shahabuddindelawar #talibaneshttps://t.co/SIZaqW0rZS
— Lokmat (@MiLOKMAT) August 26, 2021