विश्व संस्कृतदिनी करावयाचा संकल्प : ‘वदतु संस्कृतम् । पठतु संस्कृतम् । जयतु भारतम् ।’

विश्व संस्कृतदिनी करावयाचा संकल्प ‘वदतु संस्कृतम् । पठतु संस्कृतम् । जयतु भारतम् ।’ म्हणजे ‘संस्कृत बोला. संस्कृतचा अभ्यास करा. भारताचा विजय असो’

‘विश्व संस्कृत दिवस’ श्रावण शुक्ल पक्ष पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी असतो. या शुभ दिवशी आपण पुढील संकल्प करूया : ‘राष्ट्राच्या अस्मितेच्या संवर्धनासाठी मी माझ्या व्यावहारिक भाषेत अधिकाधिक संस्कृत शब्दांचा उपयोग करीन, तसेच माझ्या दैनंदिन व्यवहारात संस्कृतचे छोटे छोटे वाक्य, श्लोक, मंत्र यांचा उपयोग करून सतत संस्कृत शिकणे आणि शिकवणे यांसाठी प्रयत्नशील राहीन.’ ‘अग्ने व्रतपते व्रतं चरिष्यामि ।’  (वाजसनेयी शुक्लयजुर्वेद, अध्याय १, कण्डिका ५) म्हणजे ‘अनुष्ठेय व्रताच्या पालनकर्त्या अग्नि, मी तुझ्या अनुज्ञेने या व्रताचे अनुष्ठान करीन.’ ‘हे तेजस्वरूप परमात्मा ! माझ्या या संकल्पाच्या पूर्तीसाठी मला सामर्थ्य दे.

(संदर्भ : ‘मासिक गीता स्वाध्याय’, ऑगस्ट २०१२)