तळमळीने सेवा करणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या सोलापूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्वाती महामुनी (वय ४८ वर्षे) !

सौ. स्वाती महामुनी

१. उत्साही, आनंदी आणि सकारात्मक

‘सौ. स्वाती महामुनीकाकू सतत उत्साही, आनंदी आणि सकारात्मक असतात. त्यामुळे त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्ती उत्साही, आनंदी आणि सकारात्मक होतात. काकूंकडे पाहिले, तरी भाव जागृत होतो. काकूंमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे.

२. त्या प्रतिदिन व्यष्टी साधना पूर्ण करतात.

३. कुणी त्यांना त्यांची चूक सांगितली, तर त्या ती लगेच स्वीकारतात.

४. कुठल्याही साधकाची एखादी चूक त्यांच्या लक्षात आली, तर त्या लगेच संबंधित साधकाला चूक सांगून साहाय्य करतात.

५. विचारून घेऊन सेवा करणे आणि सेवेचा आढावा देणे

त्या संबंधित किंवा उत्तरदायी साधक यांना विचारून घेऊन सेवा करतात. त्यांच्या सेवेत सातत्य असते. त्या न चुकता प्रतिदिन सेवेचा आढावा देतात. सेवेत काही अडचण असेल, तर त्याविषयीही त्या लगेच कळवतात.

६. सेवेची तळमळ

अ. ‘सर्वांनी साधना करावी’, अशी त्यांची तळमळ असते. त्यांनी त्यांचे सासर आणि माहेर येथील सर्व नातेवाइकांना ‘ऑनलाईन’ सत्संगात उपस्थित रहाण्यासाठी उद्युक्त केले आहे. त्यामुळे त्यांचे बरेच नातेवाईक साधना आणि सेवाही करू लागले आहेत.

आ. काकूंचे दागिन्यांचे दुकान आहे. काकू दुकानात येणार्‍या प्रत्येक गिर्‍हाईकाला साधना सांगतात आणि त्यांना ‘ऑनलाईन’ सत्संगात उपस्थित रहाण्यासाठी उद्युक्त करतात. समाजातील अन्य व्यक्तींच्या संदर्भातही त्या असे प्रयत्न करतात.

७. मुलांकडून सेवा आणि साधना होण्यासाठी प्रयत्नरत असणे

‘मुले सतत सेवेत आणि साधनेत रहावीत’, यासाठी त्या मुलांना सेवा करण्यास सांगतात. चारचाकी गाडीतून साहित्य पोचवण्याची सेवाही त्या मुलांना सांगतात.

८. भाव

अ. काकू व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा यांचे प्रयत्न भावाच्या स्तरावर करतात. त्यामुळे ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते.

आ. परात्पर गुरुदेवांविषयी काही बोलत असतांना त्यांना भावाश्रू येतात.

९. काकूंना आलेली अनुभूती

मे २०२१ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ वा जन्मोत्सवाच्या दिवशी झाडाला लागलेले फूल तोडतांना त्याने काकूंना ‘मला गुरुदेवांच्या स्वागतासाठी झाडावरच राहू दे’, असे सूक्ष्मातून सांगणे आणि प्रत्यक्षातही ‘ते फूल अधिक आनंदी आहे’, असे त्यांना जाणवणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ सोहळा पहाण्याचे नियोजन काकूंच्या घरी केले होते. त्या दिवशी त्यांच्या घरासमोरील झाडाला २ फुले आली होती. त्यांपैकी एक फूल त्यांनी गुरुदेवांच्या छायाचित्राच्या पूजेसाठी तोडले. दुसरे फूल तोडतांना ते फूल त्यांना म्हणाले, ‘अगं, मला तोडू नकोस. मला गुरुदेवांच्या स्वागतासाठी इथे राहू दे. ते आल्यावर मी त्यांचे स्वागत करण्याची सेवा करीन.’ त्यामुळे काकूंनी ते फूल तोडले नाही. प्रत्यक्षात सोहळा चालू झाल्यावर ‘ते फूल अधिक आनंदी आहे’, असे त्यांना जाणवले.

– कु. दीपाली मतकर (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सोलापूर (१६.७.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक