शिवसेनेच्या वतीने चिकोत्रा खोर्‍यातील पूरग्रस्तांना साहित्याचे वाटप !

पूरग्रस्तांना साहित्याचे वाटप करताना संभाजीराव भोकरे आणि अन्य

कोल्हापूर, १८ ऑगस्ट – कोल्हापूर जिल्ह्यातील चिकोत्रा खोर्‍यातील हमिदवाडा, नंद्याळ, हसूर, बोळावी, बोळावीवाडी, मांगनूर या गावांत शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांच्या पुढाकाराने पूरग्रस्तांना साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी उपतालुकाप्रमुख श्री. राजेंद्र येजरे, युवासेना प्रमुख श्री. समीर देसाई, श्री. राहुल टिकले यांसह अन्य उपस्थित होते.