पणजी, १३ ऑगस्ट (वार्ता.) – स्वतःचे ट्विटर खाते बंद केल्याची तक्रार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे. ते म्हणाले, ‘‘आमचे नेते राहुल गांधी यांनी लैंगिक अत्याचार झालेल्या एका ९ वर्षांच्या दलित मुलीची भेट घेतली होती आणि त्यासंबंधी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांच्या म्हणण्याला पाठिंबा देण्यासाठी मी ट्वीट केले होते; परंतु माझे ट्विटर खाते बंद करण्यात आले. गोव्यात दलित आणि बहुजन समाजाविषयी बोलणे, तसेच त्यांची ओळख सुरक्षित ठेवणे, हा भाजपच्या शासनानुसार गुन्हा आहे.’’ (ट्विटर खात्याच्या कारभाराशी शासनाचा काय संबंध ? हे खाते गोव्यातील भाजप शासन सांभाळते का ? प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याची काँग्रेसवाल्यांची जुनीच खोड आहे. – संपादक)