वाठार स्टेशन-पिंपोडे बुद्र्क (सातारा) येथील वाकड्या पुलावर संरक्षक कठडे नसल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण
वाकड्या पुलावर संरक्षक कठडे बसवण्याविषयी नागरिकांना वारंवार मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतः लक्ष घालून कृती का करत नाही ? – संपादक
सातारा, ११ ऑगस्ट (वार्ता.) – वाठार स्टेशन-पिंपोडे बुद्र्क येथे वाकड्या पुलावर संरक्षक कठडे नसल्यामुळे लखन राजगे (वय २७ वर्षे) नावाचा युवक दुचाकीसह पुलावरून खाली पडला. या अपघातामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. याठिकाणी संरक्षक कठडे बसवण्याविषयी अनेक वेळा बांधकाम विभागाला कळवण्यात आले आहे; मात्र त्यांच्याकडून या मागणीकडे कायमच दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे या अपघातास कारणीभूत असणार्या संबंधित अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.