सातारा, १ ऑगस्ट (वार्ता.) – भाजपचे सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मेढा नगरपंचायत आणि सातारा नगरपालिका यांच्यासाठी २ कोटी ५० लाख रुपयांचा विकासनिधी मिळवून दिला आहे. या निधीमुळे मेढा नगरपंचायतीमधील ११, तर सातारा नगरपालिकेतील ११ अशी एकूण २२ विकासकामे मार्गी लागणार आहेत. यासाठी मेढा आणि सातारा येथील नागरिकांकडून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविषयी आभार व्यक्त केले जात आहेत.