जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने अतीवृष्टीने प्रभावित झालेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण !

अन्य धर्मियांनी आपद्ग्रस्तांना साहाय्य केल्याच्या बातम्या वाचायला मिळतात का ?

सातारा, १ ऑगस्ट (वार्ता.) – नाणीजधाम येथील ‘जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान’च्या वतीने वाई तालुक्यातील दरड कोसळलेल्या कोंढावळे-देवरुखवाडी या गावात अतीवृष्टीने प्रभावित झालेल्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.

या वेळी कोंढावळेचे सरपंच धोंडीबा कोंढाळकर, संस्थानचे सातारा जिल्हा सचिव दत्तात्रय चव्हाण, जिल्हा महिलाध्यक्षा सौ. रूपाली निंबाळकर, जिल्हा शिबिरप्रमुख कु. श्रद्धा बेलदार, माजी जिल्हाध्यक्ष सचिन येवले, तालुकाध्यक्ष संतोष मोजर आदी उपस्थित होते. कोंढावळे ग्रामस्थ आणि सरपंच यांनी संस्थानचे आभार मानले.