सातारा, २८ जुलै (वार्ता.) – फलटण तालुक्यातील निंबळक येथील जिल्हा परिषदेच्या अलगीकरण कक्षामध्ये पोलीस पाटील समाधान कळसकर यांनी विनयभंग केला असल्याची तक्रार पीडित महिलेने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. पीडित महिला मागासवर्गीय असून पोलीस पाटील समाधान कळसकर यांच्या विरोधात २२ जुलै या दिवशी विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी दिली आहे.
पोलीस पाटील समाधान कळसकर यांना अद्याप अटक नाही ?राज्यात सातारा पोलीस दलाला मोठा मान आहे. अनेक गावगुंडांना सातारा पोलिसांनी वठणीवर आणले आहे; मात्र २२ जुलै या दिवशी गुन्हा नोंद होऊनही पोलीस पाटील समाधान कळसकर यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही ? यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. |