१. पू. रेखाताईंची ‘सर्व साधकांना सर्व पदार्थ मिळावेत’, अशी तीव्र तळमळ आणि गुरुमाऊलीची कृपा, यांमुळे दळणवळण बंदीच्या कालावधीत साधकांना कशाचीही उणीव भासली नाही.
२. पथ्य पाळणे आवश्यक असलेल्या साधकांसाठी दळणवळण बंदीच्या कालावधीतही ते पदार्थ बनवले जात होते.
३. ‘आजारी साधकांसाठी पथ्याचे पदार्थ बनवण्याचे निरोप कधी कधी आयत्या वेळी समजतात. त्या वेळी साधकांना कोणतीही अडचण येऊ नये; म्हणून नियोजन नसतांनाही ते पदार्थ बनवले जातात.
४. स्वयंपाकघरात साधकसंख्या अल्प असते. पू. ताई ‘कितीही अडचणी आल्या, तरी साधकांची गैरसोय होणार नाही’, याची काळजी घेतात. केवळ महाप्रसादाच्या संदर्भात नाही, तर सर्वच गोष्टींच्या संदर्भात पू. ताई साधकांची काळजी घेतात.
५. एखादे सूत्र हाताळतांना पू. रेखाताई ‘गुरुधनाची हानी होणार नाही, साधक दुखावले जाणार नाहीत आणि साधकांच्या अडचणी समजून घेतल्या जातील’, ही तीन सूत्रे लक्षात घेतात. ‘या तिन्ही स्तरांवर ही सूत्रे हाताळली, तर कार्यपद्धतीचे पालन होते. साधकांना त्यांच्या चुकांची जाणीव होते आणि ते दुखावलेही जात नाहीत’, हे मला शिकायला मिळाले.
कृतज्ञता आणि प्रार्थना
‘हे गुरुमाऊली, या घोर कलियुगात तूच संतांच्या माध्यमातून आमची सर्वतोपरी काळजी घेत आहेस. आम्हाला पू. रेखाताईंकडून ‘समष्टीचा विचार करणे, प्रेमभाव, नियोजनकौशल्य आणि तत्परता’, यांसारखे अनेक गुण शिकायला मिळत आहेत. तू मला पू. रेखाताईंचा सहवास दिलास’, यासाठी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘मलाही पू. ताईंसारखे समष्टीसाठी सिद्ध कर’, अशी तुझ्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’
– कु. शीतल चिंचकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.११.२०२०)