‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे निर्माण करण्यासाठी ज्या जागेची निवड करण्यात आली होती, त्या ठिकाणी ४.६.२०२१ या दिवशी दुपारी १२ ते ३ या वेळेत भूमीपूजन करावे’, असे मार्गदर्शन महर्षींनी केले होते. पूजनाच्या ठिकाणी आदल्या दिवशी रात्रीपासून ४.६.२०२१ या दिवशी दुपारी १२ वाजेपर्यंत अल्प-अधिक प्रमाणात पाऊस चालू होता. विधीच्या ठिकाणी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, यांचे आगमन होताच पाऊस थांबला आणि आकाश निरभ्र झाले. यातून ‘महर्षींनी दिलेल्या वेळेत विधी निर्विघ्न होण्यासाठी त्यांचा संकल्प झालेलाच असतो आणि तेच विधी निर्विघ्नपणे करवून घेतात’, याची अनुभूती आली.
या अनुभूतीविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, यांनी सांगितले, ‘‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय स्थापन होणे’, हे ईश्वरी कार्य आहे. त्यासाठी पंचमहाभूतांची नेहमीच अनुकूलता रहाणार आहे. ‘ऊन आणि पाऊस पडणे’ हे पंचमहाभूतांच्याच अधिपत्याखाली असल्याने या विधीत पावसामुळे अडथळा येऊ शकला नाही.’’
– श्री. अमर जोशी, सनातन पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |