देहली येथे चर्च पाडल्याच्या प्रकरणी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शामा महंमद यांनी ‘आप’ आणि भाजप यांना धरले दोषी !

अशा प्रकारे आरोप करून गोव्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी ख्रिस्त्यांचे ध्रुवीकरण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ठरील का ?

शामा महंमद

पणजी, १४ जुलै (वार्ता.) – दक्षिण देहली जिल्हा प्रशासनाने छतरपूर भागात अतिक्रमण केलेल्या भूमीवर बांधण्यात आलेले चर्च १२ जुलै या दिवशी पाडले. गोवा दौर्‍यावर असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शामा महंमद यांनी या प्रकरणी ‘आप’ आणि भाजप यांना दोषी धरले आहे.

दक्षिण देहली जिल्हा प्रशासनाच्या मते हे चर्च ग्रामसभा भूमीवर बांधण्यात आले आहे. या भूमीवर काही जणांनी धार्मिक बांधकाम करून अतिक्रमण केले आणि हे पुढे वाढत गेले. यामुळे  हे अनधिकृत बांधकाम पाडले.

शामा महंमद म्हणाल्या, ‘‘कारवाईशी संबंधित एका आंतरिक समितीमध्ये ‘आप’चे २, भाजपचा १ आमदार आणि भाजपचे ३ नगरसेवक आहेत. ही कारवाई म्हणजे ‘आप’ आणि भाजप यांनी संयुक्तपणे केलेली कृती आहे. देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या घटनेला अनुसरून ‘मला कोणतीच माहिती नाही’, असे म्हणू शकत नाहीत. कारवाई करण्यात आलेले एक धार्मिक स्थळ असल्याने कारवाई करण्यापूर्वी किमान एक नोटीस संबंधितांना पाठवायला पाहिजे होती.’’ (आंध्रप्रदेशमध्ये कित्येक मंदिरांच्या भूमीवर ख्रिस्त्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यावर शामा महंमद काही बोलतील का ? धर्माच्या आधारावर राजकारण करण्यात काँग्रेसवाले आधीपासूनच पटाईत आहेत ! – संपादक)

चर्च पाडण्यासाठी न्यायालयाने आदेश दिला होता ! – मुख्यमंत्री केजरीवाल

दक्षिण देहली जिल्हा प्रशासनाने छतरपूर भागात पाडलेल्या अनधिकृत चर्चविषयी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता उत्तरादाखल ते म्हणाले, ‘‘चर्चवरील कारवाई केंद्रशासनाच्या अखत्यारितील संस्थेने केली आहे. माझ्या माहितीप्रमाणे चर्च पाडण्यासाठी न्यायालयाने आदेश दिला होता. मी देहलीला गेल्यावर या प्रकरणाचा अभ्यास करीन आणि संबंधितांना या प्रकरणी न्याय मिळेल असे पाहीन.’’

अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळाविषयी जागरूक असलेले पत्रकार हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर होणार्‍या अत्याचारांविषयी एवढे कधी जागरूक असतात का ?

गोवा दौर्‍यावर असलेले देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गोवा दौर्‍यावर असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शामा महंमद यांच्या आज गोव्यात निरनिराळ्या पत्रकार परिषदा झाल्या. या पत्रकार परिषदेम उपस्थित पत्रकारांनी छतरपूर भागात अनधिकृत चर्चवरील कारवाईवरून दोघांनाही त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या. अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळाविषयी पत्रकार किती जागरूक असतात हेच यावरून दिसून होते.