एका महिलेचा समावेश !
अशा देशद्रोह्यांना फाशीची शिक्षा देणारा कायदा केल्यासच असे प्रकार थांबतील, हे सरकारने लक्षात घ्यावे !
श्रीनगर – आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने काश्मीरमध्ये आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. यामध्ये एका ३६ वर्षीय महिलेचाही समावेश असून तिच्याकडून चिनी ग्रेनेड हस्तगत करण्यात आले आहेत. आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणात यंत्रणेने जम्मू-काश्मीरमधील अनेक भागांत छापे घातले.
कश्मीर घाटी में NIA की बड़ी कर्रवाई, टेरर फंडिंग केस में श्रीनगर और अनंतनाग से पांच गिरफ्तार https://t.co/XKQ7Giy3OI
— NBT Hindi News (@NavbharatTimes) July 11, 2021
हा अर्थपुरवठा काश्मीर खोर्यातील आतंकवाद्यांना ‘इस्लामिक स्टेट’ या जिहादी आतंकवादी संघटनेकडून केला जात आहे का ?’ याचा शोध यंत्रणा घेत आहे. या प्रकरणात आणखी लोकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कारवाई राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल हे संयुक्तपणे करत आहेत.