सुरक्षादलांची माहिती घेण्याचा प्रयत्न !
भारताने लवकरात लवकर ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित करून त्यांचा वापर केला पाहिजे !
नवी देहली – जिहादी आतंकवाद्यांकडून जम्मूमध्ये सैन्यदल आणि वायूूदल यांच्या तळांवर ड्रोनद्वारे आक्रमण करण्याच्या प्रयत्नानंतर आता नक्षलवादीही सुरक्षादलांची माहिती गोळा करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा प्रयत्न करू लागले असल्याचे समोर आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार नुकतेच छत्तीसगड येथील सुकमामधील दोरनापाल येथे ड्रोन दिसून आले होते. येथे तैनात सुरक्षादलांची माहिती घेण्यासाठी यांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ‘भविष्यात नक्षलवाद्यांकडून या ड्रोन्सचा वापर आक्रमण करण्यासाठीही होऊ शकतो’, असे म्हटले जात आहे.