(म्हणे) ‘कुणाच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी चित्रपटाचे नाव पालटणार !’

‘सत्यनारायण की कथा’ या चित्रपटाच्या नावाविषयी दिग्दर्शक समीर विद्वांस यांची घोषणा !

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान किंवा आक्षेपार्ह चित्रण करून चित्रपटाचे ‘प्रमोशन’ करण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. असे प्रकार होऊ नयेत, यासाठी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष घालणे अपेक्षित आहे.

समीर विद्वांस

मुंबई – या चित्रपटाच्या नावामुळे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी ‘सत्यनारायण की कथा’ या येणार्‍या चित्रपटाचे नाव पालटण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे ‘ट्वीट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी केले आहे. याला चित्रपटाचे निर्माते आणि ‘क्रिएटीव्ह टीम’ने पाठिंबा दिला आहे. चित्रपटाच्या नवीन नावाची घोषणा लवकरच करण्यात येईल, असे विद्वांस यांनी म्हटले आहे. हा चित्रपट प्रेमकहाणीवर आधारित असतांना चित्रपटाचे नाव ‘सत्यनारायण की कथा’, असे का देण्यात आले, याविषयी धर्मप्रेमी हिंदूंकडून प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.