भंडारा येथे कोरोनाचे नियम न पाळणार्‍या श्‍यामसुंदर लॉनला तहसीलदारांनी ठोकले टाळे !

भंडारा – गेल्‍या ३ दिवसांमध्‍ये येथील तहसीलदार अक्षय पोयाम यांनी २ सभागृहांवर दंडात्‍मक कारवाई केली होती; मात्र या नंतरही नियम न पाळणार्‍या शहरातील श्‍यामसुंदर लॉनला तहसीलदार यांनी टाळे ठोकले आहे.

विवाह समारंभात ५० हून अधिक लोक उपस्‍थित राहिल्‍यामुळे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी २६ जून या दिवशी ठाणा येथील बावनकुळे सभागृहाला १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला, तर २७ जून या दिवशी श्‍यामसुंदर लॉन येथेही निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक नागरिक असल्‍याने या लॉन मालकावरही १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्‍यात आला.
‘यापुढे नियम मोडल्‍यास सभागृहाला टाळे ठोकण्‍यात येईल’, अशी सूचनाही देण्‍यात आली. तरीही २८ जून या दिवशी श्‍यामसुंदर लॉन येथे झालेल्‍या विवाह समारंभात नियमांपेक्षा तिप्‍पट नागरिक होते.