(म्हणे) ‘काश्मीरप्रश्‍न सुटला, तर अण्वस्त्रांची आवश्यकता नाही !’

शेजारील देशांना काळजी करण्याइतकी अण्वस्त्रे पाककडे असल्याची इम्रान खान यांची धमकी !

  • पाककडे किती अण्वस्त्रे आहेत, यापेक्षा त्याची क्षमता आणि त्याचा वापर करण्याचे डोके पाककडे किती आहे, हे भारताला ठाऊक आहे. त्यामुळे पाकने अशा प्रकारच्या धमक्या भारताला देऊ नयेत, हे त्याने लक्षात ठेवावे !
  • काश्मीरचा प्रश्‍न चर्चेतून सुटणार नाही, तर युद्धातूनच सुटेल, हे स्पष्ट असतांना भारताकडून तसे प्रयत्न न होणे, हे भारतियांचे दुर्दैवच म्हणावे लागेल !
इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे संरक्षण करण्यासाठी पुरेशी अण्वस्त्रे सज्ज आहेत. माझ्या माहितीनुसार ही एक आक्षेपार्ह गोष्ट नाही. शेजारील कोणत्याही देशाला याविषयी काळजी बाळगावी लागेल, इतका शस्त्रसाठा आमच्याकडे आहे.

ज्या दिवशी काश्मीरचा प्रश्‍न सुटेल, त्या दिवशी कोणत्याही अण्वस्त्राची आवश्यकता भासणार नाही, असे विधान पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. ‘अमेरिकेची इच्छा आणि संकल्प असेल, तर काश्मीरप्रश्‍न नक्कीच सुटू शकतो’, असेही इम्रान खान यांनी अमेरिकेला उद्देशून म्हटले आहे.

पाककडे सध्या १६५ अण्वस्त्रे असल्याची माहिती ‘स्टॉकहोल्म आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थे’ने दिली आहे. यात आणखी वाढ करण्याचा पाकचा प्रयत्न आहे, असेही या संस्थेने म्हटले आहे.