‘महाराष्ट्रातील आतंकवादविरोधी पथकाने मुंबईतील नागपाडा येथून जिगर पंड्या (वय २७ वर्षे) आणि त्याचा मानखुर्द येथील मित्र अबू ताहीर (वय ३१ वर्षे) यांच्याकडून अण्वस्त्रांसाठी वापरण्यात येणारे ७ किलो युरेनियम जप्त केले असून त्यांना अटक करण्यात आली. युरेनियम खरेदी करण्यासाठी कुणी इच्छुक आहे का ? याचा ते दोघे शोध घेत असतांनाच पथकाने धाड टाकली. युरेनियमचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मूल्य २१ कोटी रुपये इतकी आहे.’