अकोला येथे गांजा तस्करीप्रकरणी आतंकवादविरोधी पथकाकडून २ धर्मांधांना अटक !

समाजाला व्यसनाधीन करण्यात धर्मांधच नेहमी पुढे असतात, हेच यावरून उघड होते.

अकोला – अमरावतीमधील हमजा प्लॉट येथून १ जून या दिवशी दुपारी चारचाकीतून विक्रीसाठी आलेला ४ लाख रुपयांचा गांजा आतंकवादविरोधी पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी पथकाने इरफान खान आणि जमीर खान या दोघा धर्मांधांना अटक केली आहे. कारवाईच्या वेळी एक आरोपी पळून गेला. (पळून जाणार्‍या आरोपीला न पकडणारे पोलीस सशस्त्र आतंकवाद्यांना कसे पकडणार ? – संपादक)

पथकाने ४४ किलो मादक अमली पदार्थ गांजाची ४ पोती असलेला ४ लाख ४ सहस्र ४०० रुपयांचा माल आणि चारचाकी वाहन, असा एकूण ६ लाख रुपये किमतीचा माल जप्त केला आहे.