‘जेनोसाईड बिल’मुळे विश्वातील हिंदूंवरील नरसंहाराचे आक्रमण भारताला थेटपणे परतवून लावता येईल ! – अधिवक्ता टिटो गंजू

अधिवक्ता टिटो गंजू

‘जेनोसाईड (नरसंहार)’ चे विविध टप्पे असून ते ओळखून त्वरित कार्य करणे आवश्यक आहे. काश्मिरी हिंदू नरसंहाराचे बळी आहेतच; परंतु ते नरसंहार नाकारल्याचेही बळी आहेत. पाकिस्तान निश्चितच या विस्थापनाला कारणीभूत आहे. तत्कालीन भारत सरकारने हा वंशविच्छेद नाही, हे म्हणणेही विस्थापनाला तितकेच कारणीभूत आहे. राज्य सरकारने आजपर्यंत झालेल्या सर्व हत्यांची नोंद अद्यापही आपल्याकडे उपलब्ध नाही. आजपर्यंत एकाही आरोपीला अटक होऊन शिक्षा झाली नाही. ‘जेनोसाईड बिल’मुळे विश्वातील हिंदूंवर होणारे नरसंहाराचे आक्रमण भारताला थेटपणे परतवून लावता येईल. काश्मिरी हिंदूंचे ७०० वर्षांमध्ये ७ वेळा विस्थापन झाले आहे. ‘गजवा ए हिंद’च्या फतव्यानुसार संपूर्ण भारतीय भूमीला इस्लामिक राजवट करण्याचे जिहाद्यांचे ध्येय आहे आणि प्रत्यक्षातही हिमालय प्रदेशातील भूमीला इस्लामी राजवट आणण्याचा प्रयत्न होत आहे. तरीही काश्मिरी हिंदूंना कुणीही पूर्णपणे संपवू शकलेले नाही, या मागे एक दैवी शक्तीच आहे.