नवी देहली – अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांतून भारतात आलेल्या मुसलमानेतर नागरिकांना आता भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. केंद्र सरकारने या देशांतील मुसलमानेतर नागरिकांकडून भारतीय नागरिकत्वासाठीचे अर्ज मागवले आहेत. या देशांमधून आलेले हिंदू, जैन, शीख, पारशी आणि बौद्ध धर्मीय नागरिक, जे पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात अन् छत्तीसगड या राज्यांतील १३ जिल्ह्यांमध्ये रहात आहेत, त्यांच्याकडून हे अर्ज मागवण्यात आले आहेत. हे अर्ज ‘ऑनलाईन’ पद्धतीने प्रविष्ट केले जातील, तसेच या अर्जांची पडताळणी राज्य आणि जिल्हा पातळीवर करण्यात येईल.