परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा असणार्‍या आणि पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ८८ वर्षे) यांची सेवा मनोभावे करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. ज्योती दाते !

वैशाख पौर्णिमा (२६.५.२०२१) या दिवशी सौ. ज्योती दाते यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्यांच्या सासूबाई पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी

१. सनातनच्या तिन्ही गुरूंविषयी प्रेम असणे

‘सौ. ज्योती दाते यांची परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा आणि त्यांच्याविषयी प्रेम आहे. त्या परात्पर गुरुदेवांचे आज्ञापालन करतात. तसेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना देवीसमान मानून त्यांच्यावरही अलोट प्रेम करतात.

सौ. ज्योती दाते

२. देवाला अपेक्षित सेवा करण्याची तळमळ

त्यांच्या मनात सतत सेवेचे विचार असतात. कोणतीही सेवा केली की, परात्पर गुरुदेवांना आवडेल, अशी सेवा माझ्या हातून होऊ दे, अशी त्या देवाला प्रार्थना करतात.

३. शिकण्याची वृत्ती

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्यावरही त्यांचे अलोट प्रेम आहे. सद्गुरु स्वातीताई कधी पुण्याला येतात, याची त्या सतत वाट पहात असतात. ‘त्या आल्यावर मला त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळेल’, असे त्या मला सांगत असतात.

४. पू. निर्मला दाते यांची सेवा तत्परतेने करणे

सर्व सेवा करतांना त्यांचे घराकडेही लक्ष असते. मी पुष्कळ वयस्कर असल्याने त्या माझीही सेवा करतात. ‘मला काय आवडते ?’, याचाही त्या सतत विचार करतात. माझे आता वय झाल्यामुळे त्या मला काहीही करू देत नाहीत. माझी सेवा करण्यात त्या नेहमी तत्पर असतात.’

– (पू.) श्रीमती निर्मला दाते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२१)