पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांची ढोंगबाजी सी.एन्.एन्. वृत्तवाहिनीकडून उघड !

पॅलेस्टाईनमधील मुसलमानांची बाजू घेणार्‍या पाककडून चीनमधील उघूर मुसलमानांवरील अत्याचारांवर मौन !

भारतातील पाकप्रेमी आणि पॅलेस्टाईनचा पुळका असणारे याविषयी बोलतील का ? माती नरम असली की, ती कोपर्‍याने खणणारे भारतातील धर्मांध चीनसमोर मात्र शेपूट घालतात, हे लक्षात घ्या !

पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी

नवर देहली – इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात नुकत्याच झालेल्या संघर्षावरून तुर्कस्तान आणि पाकिस्तान यांनी पॅलेस्टाईनची बाजू घेत इस्रायलच्या विरोधात इस्लामी देशांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. या दोन्ही देशांना पॅलेस्टॉईनमधील मुसलमानांविषयी जितकी काळजी आहे तितकी काळजी चीनमधील उघूर मुसलमानांविषयी नाही, हे पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानांवरून स्पष्ट झाले आहे. पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमदू कुरेशी अमेरिकेच्या दौर्‍यावर असतांना सी.एन्.एन्. या वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने याविषयी कुरेशी यांना प्रश्‍न विचारला असता त्यांनी तो टोलवण्याचा प्रयत्न केला.

१. कुरेशी यांनी म्हटले की, तुम्हाला ठाऊकच आहे की, चीन आणि पाकिस्तान चांगले मित्र आहेत. अनेक चढ-उतरांवर आम्ही एकमेकांचे साहाय्य केले आहे. आमच्याकडे चर्चा करण्यासाठी अनेक सूत्रे आहेत. त्यासाठी आम्ही आमच्या राजनैतिक प्रक्रियेचा वापर करतो. आम्ही प्रत्येक विषयावर सार्वजनिक चर्चा करण्यास सिद्ध नाही.

२. या उत्तरावर सी.एन्.एन्.च्या महिला पत्रकाराने प्रश्‍न विचारला की, कोणत्याही देशात होणार्‍या मानवाधिकाराच्या उल्लंघनाविषयी तुम्ही डोळे बंद करून राहू शकत नाही. तुम्ही याविषयी तुमच्या पंतप्रधानांशी कधी चर्चा केली आहे का ? यावर कुरेशी यांनी म्हटले की, एखादे काम करण्याची प्रत्येक वेळी एक पद्धत असते आणि आम्हाला आमच्या दायित्वाचे भान आहे.