पू. शालिनी माईणकरआजी यांच्या सेवेत असतांना शिकायला मिळालेली सूत्रे

वैशाख शुक्ल पक्ष अष्टमी (२० मे) या दिवशी रामनाथी आश्रमातील संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकर यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने…

पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी

सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास असलेल्या सनातनच्या ८६ व्या संत पू. शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) यांनी ११.५.२०२१ या रात्री १.३८ वाजता देहत्याग केला. आज त्यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या संदर्भात साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. ‘पू. आजींची त्वचा कापसाप्रमाणे मऊ झाली होती. 

२. अनेक प्रसंगातून पू. आजींकडून इतरांचा विचार करणे, निरपेक्षता आदी गुण शिकायला मिळाले.

सौ. नमिता पात्रीकर

३. पू. आजींचा शबरीसारखा भाव असणे

पू. आजींकडे गेल्यावर मला त्यांच्या खोलीत पुष्कळ शांत वाटायचे. नामजपाला बसल्यावर त्यांच्याकडे पाहून श्रीरामाची आठवण यायची. त्या मला शबरी आणि श्रीराम यांची गोष्ट सांगायच्या. त्यांचा भाव शबरीसारखा होता. एकदा त्या जेवण करत असतांना ‘शबरी जशी प्रत्येक बोराची चव घेत होती, तसेच त्या प्रत्येक घासाची चव घेऊन श्रीरामाला भरवत आहेत’, असे मला वाटले. त्यांची देवाप्रती अपार भक्ती होती.

मला पू. आजींची सेवा करण्याची संधी मिळाली. त्याविषयी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– सौ. नमिता पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.५.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक