‘समतेसाठी लढणार्या सैन्यात सेनापती, हाताखालचे निरनिराळे अधिकारी, चतुरंगसेना इत्यादी भेद (फरक) परस्पर अधिकार तारतम्यामुळे असतातच. ज्याच्या त्याच्या अधिकारानुसार आज्ञाकारी, आज्ञाधारी हे भेद नाहीसे केल्यास कोणतेच राष्ट्र टिकणार नाही.
कोणत्याही खात्यात, न्यायालयात उच्च-नीच भेद, अधिकार – तारतम्य आणि अल्प-अधिक कार्यक्षमता असतेच. सर्व भेदांचे निर्मूलन करण्यासाठी भरलेल्या सभेतही, स्थापलेल्या समाजातही, समतेचा उदो उदो करणार्या राष्ट्रातही अध्यक्ष, उपाध्यक्ष आदी भेद (फरक) आहेतच. ज्याचा त्याचा अधिकार भेद (फरक) आणि आज्ञाकारी-आज्ञाधारी इत्यादी संबंधामुळे उच्च-नीच भावना असतातच.
सहभोजनादी उथळ साधनांनी समता आणि ऐक्य निर्माण होणार नाही. सहभोजन, अस्पृश्यता निवारण आदी गोष्टींनी अंतःस्थ प्रेम वाढून विषमता नाहीशी झाली असती, तर बाल्यावस्थेपासून एकाच ठिकाणी वाढलेली एकाच माता-पित्यांची मुले एकमेकांशी का भांडली असती ?
– प.प. भगवान श्रीधरस्वामी
(संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’)