केरळमध्ये सत्तेत आल्यास लव्ह जिहादविरोधी कायदा करू ! – राजनाथ सिंह

केरळमध्येच नव्हे, तर संपूर्ण देशात केंद्र सरकारने केवळ लव्ह जिहादविरोधीच नव्हे, तर धर्मांतरविरोधी, लोकसंख्या नियंत्रण, समान नागरी कायदा आदी कायदे केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

राजनाथ सिंह

थिरूवनंतपूरम् (केरळ) – सर्वांना न्याय, कुणाचेही लांगूलचालन नाही, असेच आमचे धोरण आहे. केरळमध्ये सत्तेत आल्यास लव्ह जिहादविरोधात कायदा करण्यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यातील पम्बडी येथे रोड शोच्या वेळी केले.